Brand Logo
Brand Logo
संधिवात (आर्थ्रायटिस) आणि वयाशी संबंधित समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी कशी मदत करते? संधिवात (आर्थ्रायटिस) आणि वयाशी संबंधित समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी कशी मदत करते?

संधिवात (आर्थ्रायटिस) आणि वयाशी संबंधित समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी कशी मदत करते?


Surya Hospital

Surya Hospital

Surya Hospital 9 Min Read | 708

संधिवात (आर्थ्रायटिस) आणि वयाशी संबंधित इतर समस्या समजून घेणे:

संधिवात (आर्थ्रायटिस) ही सतत सांध्याची होणारी जळजळ आहे आणि यामुळे वेदना होतात, सूज येते आणि ताठरपणा जाणवतो. जगभरातील कोट्यवधी लोकं याने त्रस्त असतात आणि सांध्याची उपास्थि (जॉईंट कार्टिलेज) आणि हाडांची सतत झीज होत असल्याने वयानुसार संधिवात (आर्थ्रायटिस) होण्याची शक्यता वाढते. संधिवात व्यतिरिक्त, ऑस्टिओपोरोसिस, स्पायनल स्टेनोसिस आणि डिजनरेटिव्ह डिस्क डिजनरेशन सारख्या वयाशी संबंधित परिस्थिती, अस्वस्थता आणि मर्यादित हालचालींना कारणीभूत ठरू शकतात.

ऑर्थोपेडिक मूल्यांकन

ऑर्थोपेडिक मूल्यांकन ही संधिवात (आर्थ्रायटिस) आणि वयाशी संबंधित समस्यांवर उपाय काढण्याकरिता एक प्रारंभिक चरण आहे. ऑर्थोपेडिक तज्ञ हे शारीरिक चाचण्या, एक्स-रे आणि एम.आर.आय सारखे इमेजिंग अभ्यास करतील आणि संपूर्ण वैद्यकीय इतिहास केले जातील. ही तपासणी केल्याने डॉक्टरांना समस्येचे अचूक निदान करता येते आणि योग्य उपचार योजना तयार करता येतात.

शस्त्रक्रिया न करता (नॉन-सर्जिकल)

संधिवात (आर्थ्रायटिस) आणि वयाशी संबंधित इतर समस्या अनेक शस्त्रक्रिया न करता (नॉन-सर्जिकल) प्रभावीपणे व्यवस्थापित करता येतात. यात याचा समावेश असू शकतो:

औषधोपचार: सांधेदुखी आणि जळजळ कमी करण्यासाठी, नियमितपणे वेदना निवारक आणि दाहक-रोधी औषधे दिली जातात.

शारीरिक उपचार: सांध्यांची लवचिकता, सामर्थ्य आणि संतुलन सुधारेल, चांगले कार्य करू देईल आणि वेदना कमी करेल, अशा गरजेप्रमाणे तयार केलेल्या एका शारीरिक उपचार कार्यक्रमाचा फायदा होऊ शकतो.

सहाय्यक उपकरणे: ऑर्थोपेडिक डॉक्टर अशक्त झालेल्या सांध्यांना आधार देण्यासाठी आणि हालचाली वाढविण्यात मदत करण्यासाठी काठ्या, वॉकर किंवा ब्रेसेस सारख्या सहाय्यक उपकरणांचा वापर करण्याचा सल्ला देऊ शकतात.

इंजेक्शन्समुळे जळजळ कमी होते आणि प्रभावित सांध्यांना वंगण मिळते आणि म्हणून त्वरित आराम मिळू शकतो.

रेडिओफ्रिक्वेन्सी ॲब्लेशन: रेडिओफ्रिक्वेन्सी ऊर्जेचा वापर करून वेदना संकेतांमध्ये (सिग्नलमध्ये) बाधा तयार करून तीव्र वेदनांवर उपचार करता येतात.

व्हर्टेब्रोप्लास्टी / कायफोप्लास्टी: हे ऑस्टिओपोरोटिक स्पायनल फ्रॅक्चर स्थिर करण्यासाठी कमीतकमी चिरफाड-युक्त तंत्र आहे आणि याच्यामुळे वेदना कमी करता येतात आणि कशेरुकला चांगली ताकद प्रदान करता येते.

शस्त्रक्रियेच्या प्रक्रिया

अधिक गंभीर परिस्थितींमध्ये संधिवात (आर्थ्रायटिस) आणि वयाशी संबंधित समस्या व्यवस्थापित करण्यासाठी शस्त्रक्रियेच्या प्रक्रिया कराव्या लागू शकतात. झिजलेल्या सांध्यांवर उपचार करण्यासाठी, कार्य पूर्ववत करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी ऑर्थोपेडिक सर्जन अत्याधुनिक शस्त्रक्रियेच्या प्रक्रिया वापरतात. सामान्य

ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियांची उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत:

सांधे बदलणे: नितंब आणि गुडघे बदलण्यासारख्या एकूण किंवा अंशतः सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रिया लक्षणीय वेदना कमी करतात आणि सांध्याचे कार्य वाढवतात.

पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया: लॅमिनेक्टॉमी किंवा डिस्केक्टॉमी सारख्या शस्त्रक्रिया तंत्रामुळे स्पायनल स्टेनोसिस किंवा फाटलेल्या डिस्कसारख्या परिस्थितींमध्ये पाठीच्या कण्यावरील आणि मज्जातंतूंवरील दबाव कमी होऊ शकतो.

ऑस्टिओटॉमी: ही एक शस्त्रक्रियेची प्रक्रिया आहे ज्यामध्ये हाडांना पुन्हा आकार दिला जातो किंवा पुन्हा जागेवर बसवले जाते जेणेकरून सांध्यांचे संरेखन आणि कार्य सुधारता येते.

शस्त्रक्रियेनंतर बरे होणे

बरे होणे हे शस्त्रक्रिया झाल्यावर ऑर्थोपेडिक उपचारांचा एक महत्त्वाचा भाग आहे. सामर्थ्य, लवचिकता आणि हालचालींची श्रेणी परत मिळविण्यात शारीरिक आणि व्यावसायिक उपचारांमुळे रुग्णांना मदत होते. प्रदान केलेल्या बरे होण्याच्या योजनांचे पालन करणे हे चांगल्या पद्धतीने बरे होणे आणि दीर्घकालीन क्रियाशील सुधारणा करण्यासाठी महत्वाचे आहे.

जीवनशैलीत बदल

संधिवात (आर्थ्रायटिस) आणि वयाशी संबंधित समस्यांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी ऑर्थोपेडिक केअर मध्ये जीवनशैलीत बदल करण्याच्या महत्त्वावर भर दिला जातो. यात यांचा समावेश असू शकतो:

नियमित व्यायाम: कमी-प्रभाव पाडणारे व्यायाम, जसे की पोहणे, चालणे आणि सायकल चालविणे, सांध्यांचे आरोग्य आणि सामान्य तंदुरुस्ती राखण्यास मदत करतात.

पौष्टिक संतुलित आहार: खास करून कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहार घेतल्याने हाडांचे आरोग्य चांगले होते आणि ऑस्टिओपोरोसिसचे प्रमाण कमी होते.

वजनावर नियंत्रण ठेवणे: आरोग्यदायी वजन राखले, तर गुडघे आणि नितंब यांच्या सारख्या वजन उचलणाऱ्या सांध्यांवरील ताण कमी होण्यास मदत होते.

गतिहीन सवयी टाळणे: दीर्घकाळ निष्क्रियतेमुळे सांधे ताठ होऊ शकतात, म्हणून दिवसभर सक्रिय राहणे महत्वाचे असते.

निष्कर्ष:

संधिवात (आर्थ्रायटिस) आणि वयाशी संबंधित विकारांवर योग्य उपचार करण्यासाठी व्यक्तींना मदत करण्याकरिता ऑर्थोपेडिक उपचार महत्त्वपूर्ण असतात. ऑर्थोपेडिक डॉक्टरांना, गैर-शस्त्रक्रियेचे (नॉन-सर्जिकल) उपचारांपासून कमीतकमी चिरफाड-युक्त पासून शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेपर्यंत, विविध उपचार पर्यायांचा वापर करता येईल आणि रुग्णांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण उपचारपद्धती तयार करता येतील. ऑर्थोपेडिक केअरमध्ये लोकांच्या वेदना कमी केल्या जातात, कार्य पूर्ववत केले जाते आणि भावनिक आधार दिला जातो व असे करून वृद्धत्व आणि ऑर्थोपेडिक विकारांचे अडथळे असून सुद्धा सक्रिय, समाधानकारक जीवन जगण्यास प्रोत्साहित केले जाते.

Related Blogs

Book an Appointment

Your Details

Surya Hospital