मुलांमध्ये सामान्य ऑर्थोपेडिक अवस्था
Call Us: +91 8828828100

मुलांमध्ये सामान्य ऑर्थोपेडिक अवस्था

मुलांमध्ये सामान्य ऑर्थोपेडिक

14/07/2023

मुले सक्रिय असतात आणि ते सतत वाढत असतात. म्हणून त्यांना विविध प्रकारच्या ऑर्थोपेडिक समस्यांना सामोरे जावे लागते. हाडे, सांधे, स्नायू आणि संयोजी ऊति (कनेक्टिव्ह टिश्यूज) यांच्यावर हे आजार परिणाम करतात आणि यामुळे त्यांच्या हालचालींवर व त्यांच्या सामान्य आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. लवकर शोध लावता यावा, त्वरित उपचार करता यावेत आणि प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करता यावे म्हणून मुलांवर परिणाम करणाऱ्या सामान्य ऑर्थोपेडिक समस्या समजून घ्यायला हव्यात. या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण मुलांवर परिणाम करत असलेल्या काही सामान्य ऑर्थोपेडिक अवस्था पाहणार आहोत. ही माहिती पालकांना या समस्या ओळखण्यास आणि योग्यरित्या हाताळण्यास मदत करेल.

फ्रॅक्चर : साहसी वृत्ती आणि खेळातील सहभागामुळे मुलांना अनेकदा फ्रॅक्चर्स भोगावे लागतात किंवा त्यांची हाडे फ्रॅक्चर होतात. मनगटाच्या वरचा कोपऱ्या पर्यंतचा भाग (फोरआर्म), कॉलरबोन आणि खालचा पाय ही बहुतेकदा जखमी होणारी हाडे आहेत, तरीही या जखमा कोणत्याही हाडांवर परिणाम करू शकतात. या फ्रॅक्चर्सची सर्वात सामान्य कारणे आहेत – पडणे, अपघातात सामील असणे किंवा खेळात झालेल्या दुखापती. इजा झालेले अंग (अवयव) खूप दुखू शकते, त्याला सूज येऊ शकते, त्याच्यात विकार तयार होऊ शकतो आणि लक्षणांप्रमाणे हालचाल करणे कठीण होऊ शकते. अचूक निदान करता यावे म्हणून आणि कास्टिंग, स्प्लिंटिंग किंवा अत्यंत वाईट स्थितींमध्ये शस्त्रक्रिया करण्याचा समावेश असलेल्या सर्वोत्तम पद्धतींनी उपचार करता यावेत म्हणून त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

स्कोलियोसिस (पार्श्वनमन): स्कोलियोसिस ही अशी स्थिती आहे ज्यामुळे पाठीचा कणा असामान्य स्वरूपात एका बाजूला वळतो. अनुवांशिक प्रवृत्ती किंवा न्यूरोमस्क्युलर समस्यांसह बऱ्याच परिस्थितींमुळे हे उद्भवू शकते आणि बालपणात किंवा पौगंडावस्थेत असताना उघड होऊ शकते. अधिक गंभीररित्या वाकल्यामुळे पाठ ताठ होणे, खांदे असमान होणे किंवा उघडपणे पाठीच्या कण्यातील विकृती दिसून येणे, असे जाणवू शकते, परंतु सौम्य उदाहरणे कोणतीही स्पष्ट लक्षणे तयार करतील असे नाही. लवकर निदान करण्यासाठी आणि त्वरित व्यवस्थापनासाठी नियमित तपासणी करून घेणे महत्त्वपूर्ण आहे. फिजिकल थेरपी, ब्रेसिंग, मॉनिटरिंग आणि शस्त्रक्रिया हे उपचारांचे सर्व संभाव्य प्रकार आहेत.

नितंबाचे विकासात्मक शरीरवृद्धि दोष (हिप डेव्हलपमेंटल डिसप्लेसिया) (डी.डी.एच): नितंबाचा विकासात्मक शरीरवृद्धि दोष असलेल्या नवजात बाळांमध्ये आणि लहान मुलांमध्ये नितंबाचे सांधे (हिप जॉइंट) बेढब होतात किंवा ते विस्कळीत होतात. हे गर्भधारणेदरम्यान बाळ आडवे होणे (ब्रीच पोझिशन), कौटुंबिक इतिहास किंवा बाळाला झोका घालण्याच्या पद्धतींमुळे (स्वॉडलिंग मेथड्समुळे) होऊ शकते. डी.डी.एच मुळे लंगडावे लागू शकते, पायाच्या असमान हालचाली होऊ शकतात किंवा नितंब (हिप) अस्थिर होऊ शकते. प्रभावी उपचार करता यावेत म्हणून अचूक निदान करून घेणे गरजेचे आहे. सौम्य प्रकरणांसाठी हार्नेस किंवा ब्रेसेस हे संभाव्य उपचार आहेत, तर अधिक गंभीर प्रकरणांसाठी नितंबाचे (हिप) सांधे पुन्हा व्यवस्थित लावण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची गरज भासू शकते.

ऑस्गुड-स्लॅटर आजार: जी मुले आणि किशोरवयीन मुले गुडघ्यावर ताण निर्माण करणाऱ्या खेळांमध्ये किंवा इतर हालचालींमध्ये भाग घेतात त्यांना इतर वयोगटांच्या तुलनेत ऑस्गुड-स्लॅटर आजार होण्याची शक्यता जास्त असते. यात गुडघ्याच्या खाली शिनबोनशी पॅटलर टेंडन जेथे जोडले जाते तेथे सूज आणि वेदना जाणवतात. लक्षणांमध्ये गुडघेदुखी, गुडघा हुळहुळा होणे आणि एडेमाचा समावेश असू शकतो. मुख्य उपचारांमध्ये गरजेप्रमाणे हालचाली करणे, शारीरिक उपचार (थेरपी) करणे, विश्रांती घेणे आणि वेदना सांभाळणे यांचा समावेश असतो. पुरेसा वेळ देऊन आणि काळजी घेऊन बऱ्याच समस्या सोडवता येतात.

बाल अकारणिक संधिवात (ज्युव्हेनाईल इडिओपॅथिक आर्थ्रायटिस): एक जुनाट दाहक आजार – बाल अकारणिक संधिवात (ज्युव्हेनाईल इडिओपॅथिक आर्थ्रायटिस) (जे.आय.ए) झालेली 16 वर्षांखालील मुले प्रभावित होतात. एडेमा, ताठरपणा आणि सांध्यांची जळजळ याचे वैशिष्ट्य आहे. जे.आय.ए सांध्यांना हानी पोहोचवून मुलाच्या सर्वांगीण विकासावर आणि वाढीवर परिणाम करू शकतो. लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि दीर्घकालीन समस्या टाळता याव्यात म्हणून लवकर निदान आणि उपचार करून घेणे गरजेचे आहे. शारीरिक उपचार (थेरपी), औषधांचे मिश्रण आणि संधिवात तज्ञांसह नियमित पाठपुरावा भेटी हे उपचार धोरणांचे सामान्य घटक आहेत.

निष्कर्ष:
मुलांमध्ये सामान्य ऑर्थोपेडिक अवस्थांच्या बाबतीत जागरूक राहून पालकांना व काळजी घेणाऱ्यांना गुडघे दुखणे, हुळहुळे होणे आणि ते सूजणे, अशा संभाव्य समस्या शोधता येतील. मुख्य उपचारांमध्ये गरजेप्रमाणे हालचाली करणे, शारीरिक उपचार (थेरपी) करणे, विश्रांती घेणे आणि सांभाळणे यांचा समावेश असू शकतो. पुरेसा वेळ देऊन आणि काळजी घेऊन बऱ्याच समस्या सोडवता येतात. लवकर शोधून व महत्त्वपूर्ण प्रतिबंध घालून मुलांमध्ये या परिस्थिती नियंत्रित करता येतील. अधिक माहितीसाठी मुलांच्या आरोग्य तज्ञांशी सल्लामसलत करा.